आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएनजीच्या दरात वाढ:सीएनजीही 4 रु. महाग, आता 96 रु.प्रतिकिलो

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ हाेत असतानाच आता सीएनजीच्या दरात प्रति किलाेमागे तब्बल चार रुपयांनी दरवाढ झाली आहे. सीएनजी गॅसचे प्रति किलाे ९१.९० रुपये भाव हाेते. मध्यरात्रीपासून त्यात ४ रुपयांनी वाढ केल्याने हे दर ९५.९० रुपयांवर पाेहाेचल्याने वाहनधारकांना दहा किलाेमागे ४० रुपये जादा माेजावे लागणार आहेत. हे वाढीव दर बघता सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात अवघी दहा ते पंधरा रुपयांची तफावत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रति किलो ७१ रुपये एवढे होते. मे महिन्याच्या अखेरीस यात दहा रुपयांनी, जून महिन्यात चार रुपयांनी वाढ झाली हाेती. एकीकडे ग्राहकांचा कल पेट्राेल, डिझेलपेक्षा सीएनजीकडे वाढत असताना सीएनजीचा मुबलक पुरवठा हाेत नसल्याने ग्राहक त्याच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे ग्राहकांसह पंपचालकांनाही फटका बसणार असल्याचे पंपचालक मुकुंद आढाव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...