आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएनजीचे दर पेट्रोल डीझेलच्या बरोबरीने:नाशिकमध्ये दरात 4 रूपयांनी वाढ; आज रात्रीपासून 95.90 रूपयांनी खरेदी करावी लागणार

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ हाेत असतानाच आता सीएनजीच्या दरात प्रति किलाेमागे तब्बल चार रूपयांनी दरवाढ झाल्याने वाहनधारकांना झटकाच बसला आहे. सीएनजी गॅसचे प्रति किलाे 91.90 रूपये भाव असताना मध्यरात्रीपासून त्यात 4 रूपयांनी वाढ केल्याने हे दर 95.90 रूपयांवर पाेहचल्याने वाहनधारकांना दहा किलाेमागे 40 रूपयांचा जादा खर्च वाढणार आहे.

एकीकडे वाढती महागाई आणि इंधनाचे वाढते दर लक्षात घेता देशभरात केंद्र सरकारच्या धेारणांविषयी संतापाची लाट परसलेली असतानाच सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधनावरील व्हॅटच्या दरात कपात केली. यामुळे पेट्राेल व डिझेलच्या दरात प्रति लीटर पाच ते डिझेल दहा रूपयांपर्यंत लीटरमागे कमी केले हाेते. या निर्णयाने नागरिकांमध्येा समाधान व्यक्त केले जात हाेते. मात्र, या इंधन दरातील कपातीला महिनाही उलटत नाही ताेच सीएनजी दरात तब्बल चार रूपये किलाेमागे वाढ झाल्याने वाहनधारकांना फटका बसला आहे. नवीन दरवाढमुळे शहरात सीएनएजीचे दर 91 रुपये 90 पैश्यावरून 95 रूपये 90 पैसे म्हणजेच 96 रूपयांवर पोहोचला आहे. हे वाढीव दर बघता सद्यस्थितीत पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीच्या दरात अवघे दहा ते पंधरा रूपयांची तफावत आहे.

एप्रिल महिन्यापासून सातत्याने वाढ
नाशिकमध्ये एप्रिल महिन्यापासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ हाेत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये एवढे होते. त्यापाठाेपाठ मे महिनयाच्या अखेरीस यात पुन्हा दहा रूपयांनी आणि जून महिन्यात चार रूपयांनी दर वाढले हाेते. आता हेच दर 96 रुपयांच्यांवर पोहचले आहे. नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ग्राहकांसह पंपचालकांनाही फटका

जेलराेड परिसरातील आढाव पेट्राेलियमचे चालक मुकूंद आढाव म्हणाले की, सीएनजीच्या दरात दर महिन्याला वाढ हाेत असल्याने ग्राहकांसह पंपचालकांनाही आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे ग्राहकांचा कल पेट्राेल, डिझेलपेक्षा सीएनजीकडे वाढत असताना सीएनजीचा मुबलक पुरवठा हाेत नसल्याने ग्राहक त्याच्या प्रतिक्षेत असतात. मात्र, या दरवाढीने ग्राहकांना निश्चीत दणका बसणार आहे.

पेट्राेलच्या बराेबरीनेच दर आल्याने फायदा काय?

वाहनचालक​​​​​​​ साैरभ काळे​​​​​​​ म्हणाले की, सीएनजी गॅसचे दर 75 ते 80 रूपये किलाेवर असल्याने पेट्राेलचे दर 120 रूपये लीटरवर पाेहचल्याने सीएनजी कार खरेदी केली. यासाठी चार महिने प्रतिक्षा यादीत थांबून कार घेतली. त्यानंतर पाच ते सहा तास थांबून गॅस भरण्यासाठी रांगेत उभे राहताे. मात्र, कंपनीकडून वारंवार दर वाढत गेल्याने ते पेट्राेलच्या दरासाेबत आल्यनाे सीएनजीचा फायदा तरी काय?

बातम्या आणखी आहेत...