आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रवेशासह परीक्षांतील अडचणी सोडविण्यासाठी मुक्त विद्यापीठातर्फे विभागीय केंद्रांतर्गत जिल्हानिहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. अभ्यास केंद्रे आणि विद्यार्थी यांच्या प्रवेश आणि नोंदणी प्रक्रिया, विद्यार्थ्यांचे निकालासंदर्भातील अडचणी, अध्ययन साहित्य वितरण, दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी विभागीय केंद्रानिहाय अ®भ्यास केंद्र आणि विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू केले आहे. त्याकरिता जिल्हानिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी येणाऱ्या अडचणी प्रथमतः आपल्या अभ्यास केंद्राच्या पातळीवर सोडवाव्यात. आपले अभ्यास केंद्र आणि विद्यार्थ्याच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हानिहाय कर्मचान्यांसोबत आपण संपर्क साधावा. तक्रार, सूचना, समस्या अडचणी लेखी स्वरूपात विभागीय केंद्राच्या इ-मेलवर पाठवाव्यात. अभ्यास केंद्र पातळीवरील अनुत्तरीत अडचणीसाठी विभागीय केंद्रावरील जिल्हानिहाय दर्शविलेल्या समन्वयकांशी संपर्क साधावयाचा आहे. त्यासाठी विभागीय केंद्रानिहाय आणि जिल्हानिहाय समन्वयकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांशी संपर्क करून आपल्या अडचणींचे निराकरण करावयाचे आहे.
इ-मेलद्वारे अडचणी सोडविता येणार विभागीय केंद्र पातळीवरील आपली अडचण, समस्येचे निराकरण न झाल्यास आपण विद्यापीठ मुख्यालयात खालीलप्रमाणे इ-मेलवर संपर्क साधावा. विद्यापीठ स्तरावर प्रवेशविषयक अडचणींबाबत nondani@ycmou.digitaluniversity.ac तर परीक्षाविषयक अडचणींबाबत cuel@ycmou.digitaluniversity.uc आणि पुस्तकविषयक अडचणींबाबत yemousine@gmail.com यावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.