आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सन्मित्र मंडळाकडून गरजूंसाठी शीत शवपेटी उपलब्ध; सुपर 30 ग्रुपची सामाजिक बांधिलकी, स्वत:च्याच पदरचे पैसे संकलित

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक बांधिलकीच्या हेतूने स्थापित झालेल्या सुपर ३० ग्रुपच्या वतीने सर्व समाजाची गरज लक्षात घेऊन शवपेटी घेण्यात आली. शीत शवपेटी गरजवंतांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे पेटी हस्तांतरीत करण्यात आली. मंडळामार्फत गरजूंना शवपेटी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांनी दिली.

नाशिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३० युवा समाजबांधवांनी विधायक कार्य आपल्या हातून घडावे, समाजाच्या कामी काहीतरी मदत व्हावी या हेतूने सुपर ३० ग्रुपच्या माध्यमातून स्वत:च्याच पदरचे पैसे संकलित करून सध्याच्या काळात गरजेची बनलेली व धावपळ करूनही लवकर उपलब्ध न होणारी ‘शीत शवपेटी’ खरेदी केली. या पेटीची सुरक्षितता व तिची योग्यरित्या हाताळणी व्हावी यासाठी सन्मित्र मंडळास सदर पेटी सुपूर्द करण्यात आली आहे.

उपक्रमप्रसंगी मधुकर ब्राह्मणकर, सुपर ३० ग्रुपचे प्रसाद बागड, अभय कोतकर, विश्वस्त संजय येवले, भूषण महाजन, सचिन बागड, गणेश येवला, विनोद दशपुते, शरद वाणी, नीलेश मकर, जितेंद्र येवले, मनोज शिनकर, किशोर सोनजे, भूषण सोनजे. गणेश कोठावदे, उमेश महाजन, प्रशांत मोराणकर, भिला वाणी, विशाल वाणी, पंकज कोठावदे, भूषण पाटकर, अमित कोतकर, संजय दुसे, सुनील येवले, महेंद्र अमृतकर, विवेक वाणी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...