आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची लाट येणार:तापमान 3 ते 4 अंशांनी घसरण्याचा अंदाज, पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात सोमवारपासून थंडी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिमी चक्रवातामुळे १६ ते १८ डिसेंबरदरम्यान हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे सोमवार, १९ डिसेंबरपासून गुजरात आणि महाराष्ट्रातील किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घसरून थंडीत वाढ होणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, मुंबई, कोकणसह विदर्भात थंडी अधिक राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. बुधवारी रात्रभर औरंगाबादेत मुसळधार पाऊस झाला. राज्यात गुरुवारी सकाळी आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळी पुन्हा नाशिक, धुळे, नंदुरबार भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अकोला आणि बुलडाणा परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...