आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Cold War In Nashik BJP On The Administration Of The City President's Question Mark Debate; Apparently The Image Was Tarnished By Impeachment

नाशिक भाजपमध्ये शीतयुद्ध:शहराध्यक्षांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह वादाचे ग्रहण; उघडपणे आरोपामुळे प्रतिमा डागाळली

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असतानाही गुजरातला जोडणाऱ्या पेठरोडच्या दुरावस्थेवरून नाशकातील स्थानिक व अनुभवी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये लेटर बॉम्ब च्या निमित्ताने वाद सुरू झाले असून माजी गटनेता अरुण पवार यांनी पक्षाची परवानगी न घेता स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांना लक्ष करणारा लेटर बॉम्ब टाकल्यामुळे चांगली शोभा झाली आहे.

यानिमित्ताने शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचे नियंत्रण पक्षावर राहिले नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून यापूर्वी अनेक वेळा पक्षशिस्त मोडल्यानंतरही संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे किंबहुना त्यांना प्रोत्साहन दिले गेल्यामुळे आता कोणाचाच कोणाला धाक उरला नसल्याचेही या निमित्ताने बोलले जात आहे.

भाजपाचे केंद्रावर राज्यांमध्ये सत्ता असून नाशिक महापालिकेत देखील इतिहासात स्पष्ट बहुमताने प्रथम एखाद्या पक्षाला सत्ता मिळवण्याचा बहुमान भाजपाला मिळाला मात्र गत पाच वर्षांमध्ये चांगल्या कामांना ऐवजी पक्षांतर्गत वादामुळेच भाजपाची बदनामी झाली. आमदार व शहर अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब सानप यांना त्यामुळे चक्क विधानसभेची उमेदवारी गमवावी लागली. त्यानंतर कोणतीही दमदार कामगिरी नसताना किंबहुना त्यावेळी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराची उपाधी असतानाही पालवे यांना संधी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

यापूर्वी असा झाला पक्षशिस्तभंग...

नाशिक रोड प्रभाग सभापती निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेविका मीरा हांडगे यांचा पराभव झाल्यानंतर सानप व पालवे यांच्याशी संबंधित नगरसेवकांच्या बंडखोरीवर टीका टिपणी झाली मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सातपूर येथे दिनकर पाटील विरुद्ध हेमलता कांडेकर यांच्यात वाद रंगल्यानंतरही पालवे यांनी ठोस भूमिका घेतली नाही. पर्यायाने कांडेकर यांनी वेगळा रस्ता निवडला. मध्यंतरी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख पदाधिकारी दौरे तसेच भेटीगाठी मध्ये आमदार सीमा हिरे यांना वगळल्या गेल्यामुळे त्यांचीही नाराजी चर्चेत होती. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव विरुद्ध हिरे तसेच अन्य नगरसेवक असाही वाद माध्यमांपर्यंत पोहोचला होता.

परस्पर माध्यमामध्ये जाणाऱ्यांना समज देणार

भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले की, कोणतेही पदाधिकारी व माजी नगरसेवक यांच्यामध्ये मतभेद असल्यास त्यांनी एकत्रित चर्चा करून त्यावर तोडगा काढला पाहिजे. अशा पद्धतीने परस्पर माध्यमांकडे भूमिका मांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना समज दिली जाणार आहे.

अकारण विकासाला विरोध का?

स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते म्हणाले की, स्टेडियमचा प्रस्ताव ज्यावेळी मंजूर झाला, त्यावेळी विरोध का केला गेला नाही. आत्ताच अकारण विरोध का केला जात आहे. पेठ रोडच्या विकासासाठी राजकारण विरहित एकी करून निधी मिळवण्याकरता एकत्र येणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...