आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी आठवडाभर राहणार गायब:तापमानही वाढणार, आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पावसाचा अंदाज

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेचे कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी सांयकाळी चक्रीवादळात रूपांतर होऊन ते गुरुवारी सकाळी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ७ ते १० डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तेथील वातावरणामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण रहाणार आहे. यामुळे पुढील आठवडाभर कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. मंगळवारी राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली होती, तर मराठवाड्यात किमान तापमान स्थिर होते.

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष असा परिणाम जाणवणार नसल्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सुरू असल्याने त्या भागात पाऊस, बर्फ, थंडी व धुके हे कायम राहणार आहे.

असे होते राज्यातील विविध शहरांतील किमान तापमान नाशिक १८.८ जालना १६.० सोलापुर १६.७ महाबळेश्वर १४.४ परभणी १५.५ उस्मानाबाद १५.० उदगिर १४.० जळगाव १८.७ औरंगाबाद १४.८ पुणे १७.०

बातम्या आणखी आहेत...