आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाऱ्याच्या वेगासह थंडीही वाढणार!:उत्तर भारतात चक्रावातामुळे वाऱ्याचा वेग वाढला, 9 जानेवारीपासून थंडीत वाढ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतात एकापाठोपाठ चक्रवात सुरू असून दोन चक्रवातांत पुरेसा खंड पडत नसल्याने थंडीचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही. पहिल्या चक्रवाताची थंडी पडत नाही तोच दुसऱ्या चक्रवातामुळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे थंडीवर आक्रमण होत असल्याने किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील विदर्भ वगळता शनिवारी थंडीचे प्रमाण कमी झाले. मात्र उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्याच्या वेगात वाढ झाल्याने गारठा जाणवत असून राज्यात सोमवार, 9 जानेवारीपासून आठवडाभर थंडीत काही प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात शनिवारी किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. नाशिक जिल्ह्यात सकाळी दाट धुके जाणवत असल्याने दृश्यमानता काही प्रमाणात कमी झाली होती. गोंदियात रविवारी ७.० अंश सेल्सियस तापमान होते.

धुक्याचे मळभ असल्याने कडाक्याची थंडी नाही : सध्या ढगाळ वातावरण नसले तरी, जास्त उंचीपर्यंत ढगाळ सदृश धुक्याचे मळभ आच्छादित आहे. त्यामुळे रात्री जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दीर्घ लहरी उष्णता व ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नाही. त्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घसरण होत नाही. तसेच दिवसाही अशा वातावरणामुळे लघु लहरी उष्णता व ऊर्जा जमीन तापवत नाही. त्यामुळे हवेचा थरही शुष्क होत नसल्याने कडाक्याची थंडी जाणवत नसल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...