आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षात नागरिकांचे व घंटागाडी कर्मचारी, कचरा वेचकांचे आरोग्य जपण्या बरोबरच स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे. त्याच अनुशंगाने घंटागाडीतील कचऱ्याच्या विभाजनासाठी वेगवेगळे रंग असलेल्या सहा कप्प्यात कचरा संकलन होईल अशी व्यवस्था घंटागाडीत करण्यात आली आहे.घंटागाडीत कचरा संकलनासाठी सॅनिटरी नॅपकिन, ओला, सुका, प्लॅस्टिक, इ-वेस्ट कचरा हा नियमित घंटागाडीत जमा केला जाणार आहे. व्यावसायिक, रुग्णालये, हॉटेल्स, मंगल कार्यालय, पाला पाचोळ्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली आहे. अरुंद रस्त्यांसाठी सीएनजीच्या लहान वाहनाची व्यवस्था केली आहे.
या घंटागाडीतच कचरा टाकून नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीच्या मागच्या बाजूला घरगुती धोकादायक कचरा संकलन पेटी लावली. यामुळे कचरा संकलन करणाऱ्यांचे आरोग्य जपले जाणार आहे. महिला वर्गांने या पेटीचे स्वागत केले आहे.
आराेग्यासाठी उपयुक्त; यातून जंतूसंसर्ग टळेल वापरलेले सॅनिटरी पॅड नष्ट व्हायला माेठा काळ लागताे. वापरलेले सॅनिटरी पॅड कचऱ्यात जमा झाल्याने कचरा वेचणारे लोक त्यांना हाताने वेगळे करतात आणि त्यामुळे जंतूसंसर्ग किंवा त्वचेचे तसेच इतर आजार वाढण्याची दाट शक्यता असते. या वापरलेल्या पॅडची नीट विल्हेवाट लावण्यासाठी ही पेटी बसवल्याने कचरा वेचकांच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणामा टळतील. तसेच नागरिकांनी घरीच आेला व सुका कचरा वेगळा ठेवला तर ताे टाकतानाही त्याच पेट्यांमध्ये पडून पुढील ताणही वाचू शकताे. सुनील शिरसाट, मनपा घनकचरा व्यवस्थापन पूर्व,विभाग स्वच्छता निरीक्षक
विलगीकरण करुनच द्यावा कचरा नागरिकांनी कचऱ्याचे विभाजन करूनच कचरा घंटागाडीत द्यावा. बरेच नागरिक आेला व सुका कचरा एकत्रच देतात. त्यामुळे घंटागाडी कर्मचारी व नागरिकांमध्ये वादही हाेतात. कचरा वेगळा करुन दिल्यास कचऱ्याची विल्हेवाट लावणे कर्मचाऱ्यांनाही सुलभ होईल. धोकेदायक पेटीचा महिलांनी वापर करावा. सैय्यद असिफअली, नाशिक पूर्व घंटागाडी ठेकेदार
साैंदर्य टिकविण्यास मदत हाेईल रस्त्याच्या कडेला व मोकळ्या प्लॉटमध्ये नागरिकांनी कचरा न टाकता घंटागाडीत टाकल्याने शहराचे सौंदर्य टिकवण्यास मदत होईल. शक्यताे स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक हे ब्रीद सगळ्यांनीच लक्षात ठेवले तर शहर स्वच्छ हाेण्यास मदत हाेईल. प्रशासन जर एक पाऊल उचलत असले तर त्याला नागरिकांनही साथ द्यायला हवी. बंडू दळवी, समाजसेवक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.