आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता माेहिम:गोदातीरी एक टन कचऱ्याचे संकलन

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आयोजित महिला सक्षमीकरण व आरोग्यदूत विभागांतर्गत गंगा गोदावरी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले. पंचवटी येथील गंगा गोदावरीमाता मंदिर, रामकुंड परिसर स्वच्छता अभियानात पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, सिडको विभाग, ग्रामीण भागातील २०० सेवेकरी सहभागी झाले. त्यांनी जवळपास एक टन कचरा जमा केला.

गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम झाला. जिल्हा प्रतिनिधी केशव घोडेराव यांनी बालाजी कोट केंद्रावर या मोहिमेविषयी उपस्थित सेवेकरी महिला-पुरुषांना मार्गदर्शन केले. बालाजी कोट केंद्र येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात गोदावरी परिसरातील रुग्णांची नाडी तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या-औषधे वाटप करण्यात आली. १७५ गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला. अभियानात डॉक्टर्स आणि आरोग्यदूत जिल्हा प्रतिनिधी, नाशिक जिल्हा, तालुका केंद्रपातळीवरील प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.

यावेळी परिसरातील दुकानदार भाजीपाला विक्रेते, पर्यटक, भाविकांमध्ये परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य कलशामध्येच टाकावे व कचराकुंडीचा योग्य वापर करावा याबाबत जनजागृती केली.

स्वच्छतेसाठी पुढाकार
गाेदावरीचा उगम असलेल्या त्र्यंबकेश्वर ते थेट राजमुंद्रीपर्यंत प्रवाहित हाेणारी गाेदावरी स्वच्छ करण्यासाठी सेवेकऱ्यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...