आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालय; महापालिकेसमोर तीव्र निषेध आंदोलन

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ओबीसीचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक केली आहे. यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे शुद्ध गावंढळपणा आहे, अशी टीका करत याविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता व राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेवर निदर्शने केली.

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पिरिकल डेटा दारोदार जाऊन खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते. परंतु, आयोग सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे, ही ओबीसींची फसवणूक आहे. यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...