आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थापन:कॉलेजशेजारी स्थापन; भाजप युवा वॉरियर्सच्या प्रथम शाखेचे कॉलेजरोड भागात उध्घाटन

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विनोद येवले यांनी पहिली युवा वॉरियर्सची शाखा कॉलेज रोड बी.वाय.के. कॉलेजशेजारी स्थापन केली असून त्याचे उदघाटन शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालवे म्हणाले की, भाजप युवा वॉरियर्सने घराघरांपर्यंत पोहोचून समाजकार्याच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती पोहोचवावी. युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, देवदत्त जोशी, विनोद येवले यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास सुमित नहार, युवतीप्रमुख साक्षी दिंडोरकर, योगेश मैंद, अक्षय पाटील, विजय बनछोडे, अंकित गांधी, संतोष नेरे, सतीश रत्नपारखी, अमोल पाटील, शिवा जाधव, अक्षय गांगुर्डे, प्रशांत वाघ, विजय गायखे, विपुल सुराणा, एकनाथ नवले आदी उपस्थित होते. शाखा अध्यक्ष अर्जुन वडनेरे, सरचिटणीस प्रतिक येवले, अनिकेत शिंदे, सुजल येवले, अमर क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विनोद येवले यांनी समोपयोगी कामांसाठी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...