आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलाकारांच्या ‘जनस्थान’ या व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या आठव्या वर्धापन दिनानिमित २० जून ते २५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अभय ओझरकर यांनी केले आहे.
‘जनस्थान’ ग्रुपच्या वतीने पाच दिवस चालणाऱ्या उत्सवात चित्र-शिल्प प्रदर्शन, आयकॉन पुरस्कार सोहळा, गायन, नृत्य असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यंदा या महोत्सवाचे सूत्र पंचतत्त्व हे आहे. ग्रुपमधील चित्रकार, शिल्पकारांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. शहरातील कवी ‘पंचतत्त्व’ या विषयावर कविता लिहीत असून त्याला संगीतसाज चढवून एक वेगळा कार्यक्रम होणार आहे. नृत्याच्या कार्यक्रमाने फेस्टिव्हलची सांगता होईल. लवकरच आयकॉन पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.