आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोर:कोम्बिंग कारवाईचा धडाका सुरूच, 119 टवाळखोरांची रवानगी पोलिस ठाण्यात ; 374 जणांवर झाली कारवाई

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरु असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शुक्रवारी (दि. १७) पहाटेपर्यंत परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या कारवाईत ३७७ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ११९ टवाळखोरांचा समावेश आहे. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पायी पेट्रोलिंग, टवाळखोर कारवाई, गुन्हेगार चेकिंग, हत्यार प्रतिबंधक कारवाई, पाहिजे असलेले आरोपी तपासणी, तडीपार तपासणी करण्यात येत आहे. पंचवटी आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई केली जात आहे. उपआयुक्त अमोल तांबे, उपआयुक्त विजय खरात यांच्यासह सहा चार विभागांचे सहायक आयुक्त, १३ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक या कारवाई सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...