आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 दिवसांत 8 खुनाच्या घटना:पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडवर मध्यरात्रीतून कोम्बिंग ऑपरेशनचा धडाका! 108 जणांना बसला दंडूका

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये 18 दिवसांत 8 खुनाच्या घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली असून विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रात्री विनाकारण फिरणाऱ्या 105 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. बुधवारी (ता. 8) रात्री 8 ते 11 आणि रात्री 11 ते गुरुवार (ता. 9) पहाटे 4 वाजेपर्यंत झालेल्या कारवाईत 259 संशयितांवर कारवाई करण्यात आली.

पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 1 मधील पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका,गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथकाने पायी गस्त केली.विशेष मोहिमेअंतर्गत टवाळखोर कारवाई करण्यात आली. गुन्हेगार चेकिंग हत्यार प्रतिबंधक कारवाई पाहिजे असलेले आरोपी, रेकाॅर्डवरील गुन्हेगार तपासणी, तडीपार चेकिंग करण्यात आले.

विशेष पथके कार्यन्वित

कोंबिग ऑपरेशन मोहिमे अंतर्गत पायी पेट्रोलिंग पथक, कोंबिग ऑपरेशन पथक, टवाळखोर पथक, गुन्हेगार चेकिंग पथक, अवैध मद्य विक्री कारवाई पथक, अवैध जुगार प्रतिबंध पथक, हत्यार प्रतिबंध पथक, रेकाॅर्डवरील गुन्हेगार तपासणी पथक, अशी स्वतंत्र पथकाकडून शहरात ही कारवाई सुरु आहे.

अशी झाली कारवाई

अवैध मद्य विक्री- 2, अवैध हत्यार प्रतिबंध कारवाई- 4 हवे असलेले आरोपी- 18, रेकाॅर्डवरील आरोपी- 20, सर्व्हेलन्स तपासणी- 9, हिस्ट्रीसीटर- 25, तडीपार आरोपी 36, टवाळखोर- 105 तडीपार असताना शहरात वावर- 1, वाॅरंट समन्स- 7 आरोपी तपासणी- 13

पंचवटी- 40 आडगाव- 15, म्हसरुळ- 22, भद्रकाली- 64, सरकारवाडा- 32, गंगापूर- 38, मुंबईनाका- 48 अशा 259 कारवाया पोलिस ठाणे निहाय करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...