आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगरमार्गे निमाणी चक्री बससेवेला प्रारंभ; कर्मयोगीनगरच्या रहिवाशांतर्फे समाधान व्यक्त करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगर, राजीव गांधी भवनमार्गे निमाणी चक्री बससेवेला मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. याबाबत गोविंदनगर, कर्मयोगीनगरच्या रहिवाशांतर्फे समाधान व्यक्त करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी ९ वाजता गोविंदनगर येथे रहिवाशांनी बसचे स्वागत केले. गोविंदनगर, मुंबईनाका, द्वारका, नाशिकरोड, जुने सिडको, महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, कॉलेजरोड, गंगापूररोड, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जगतापनगर, उंटवाडी आदी भागातील नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

स्वागतावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, धवल खैरनार, संगीता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान निमाणी येथून सकाळी ५.४५ वाजता नाशिकरोडला पहिली बस सुटली.

बातम्या आणखी आहेत...