आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांच्या निओ मेट्राेला माेदी देणार महिनाभरात हिरवा कंदील:आढावा बैठकीत आयुक्तांचे स्पष्टीकरण; इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्रांकडे प्रस्ताव

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निओ मेट्रोला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात हिरवा कंदील देणार आहे. असे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केले.

अमृत 2 याेजनेतून 350 काेटीचा पाणी पुरवठा आराखडा तसेच 400 काेटीच्या मलनिसारण आराखड्याला निधी मिळणार असून सध्यस्थितीत इलेक्ट्रीक बसेससाठी निधीकरीता केंद्रांकडे प्रस्ताव दिल्याचे सांगितले. नमामी गाेदावरी या प्रकल्पाचा सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यानंतर डिपीआर तयार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले .

यावेळी खासदार हेमंत गाेडसे, भाजप आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड राहुल ढिकले यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीकाेनातून बैठकीचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी नियुक्त समितीमार्फत काय काम सुरू आहे याचा अंदाज घेतला. सविस्तर विकास आराखडा करण्याच्याही सुचना दिल्या. निओ मेट्राे प्रकल्प केंद्रांकडे मंजुरीच्या टप्प्यात असून त्यास महिनाभरात मंजुरी मिळेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. भाजपाकाळात घरपट्टीत अवास्तव वाढ झाली असून निवासी क्षेत्रात दुप्पट तर अनिवासी क्षेत्रात चारपट वाढ झाली. त्यात निवासीची घरपट्टी मिळत आहे मात्र अनिवासी घरपट्टी भरण्याचा कल कमी असल्यामुळे हे दर कमी करण्याची सुचना मांडली गेली. त्यावर शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे भुसे यांनी सांगितले.

मिर्ची हाॅटेल येथील अपघातानंतर शहरातील 46 पैकी 23 अपघाताच्यादृष‌्टीने असलेले अपघाताचे स्पाॅट हटवले गेल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आमदार ढिकले यांनी येथे उड‌्डाणपुल उभारण्याची पुन्हा एकदा मागणी केली. या मागणीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शासनाकडे संयुक्त पाठपुरावा करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पेठराेडला 6 किमीच्या मार्गाची चाळण झाली असून मनपा निधी तसेच नियाेजन समितीतील निधीतून डागडुजी व काॅक्रीटीकरण करावे अशीही मागणी ढिकले यांनी केली. सीमा हिरे यांनी पेलीकन पार्कचे उद‌्घाटन करणे, संभाजी स्टेडीयमचे नुतनीकरण तसेच सिडकाेतील 28 हजार घरे फ्री हाेल्ड करण्यासंदर्भात प्रक्रिया करावी अशी मागणी केली. मनपामार्फत रिक्त पदांसाठी भरती करण्याची मागणी फरांदे व ढिकले यांनी केली. आराेग्य, अग्नीशामक विभागाचे 458 पदे भरले जात आहे.

वेळखाऊ ठरलेल्या या बैठकीत निर्णय कमी आणि चर्चाच अधिक झाली. मुळात यातील बहुतांश प्रस्ताव हे भाजपाच्याकाळात मंजुर झाले असून ते मंजुरीची प्रक्रिया दिर्घकालीन आहे. तसेच काही विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत नसताना त्याचाही घेतलेला आढावा पालिका अधिकाऱ्यांना आश्चर्यचा झटका देणारा ठरला.

बातम्या आणखी आहेत...