आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा10 महिन्यांचे मानसिक आणि खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन पोलिस सेवेत दाखल झालेल्या पोलिस उपनिरिक्षकांनी अस्तित्वातील कायद्यांबरोबर सायबर गुन्ह्यांच्या तपासात विशेष लक्ष द्यावे. पोलिस दलात कर्तव्य बाजवत असताना समाजातील सर्व स्तरातील घटकांत मिसळून संभ्याव्य घटनांची माहिती काढून त्याप्रमाणे नियोजन करावे. विशेष करुन कम्युनिटी पोलिसींग हे पोलिस दलाचे महत्वाचे कार्य असल्याने त्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी केले.
पोलिस अकादमीमध्ये आयोजित प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षक सत्र क्रमांक 121 मधील 158 पुरुष आणि 13 महिला प्रशिक्षणार्थींनी मुलभूत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उपनिरिक्षकांच्या दिक्षांत सोहळ्यात ते बोलेत होते. नशिकचे भूमिपुत्र राजु सांगळे हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी आणि मानाची रिव्हालवरचे मानकरी ठरले. यावेळी अपर महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय कुमार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, संचालक राजेश कुमार मोर, विशेष पोलिस महा निरिक्षक बी.जी. शेखर, अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महासंचालक पुढे म्हणाले, पोलिस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रशिक्षण आणि अनुभवाची सांगड घालून सर्वसामान्यांशी संवेदनशिल वर्तणूकीची जबाबदारी पार पाडा. दुर्बल, न्यायाच्या अपेक्षेने येणाऱ्या कोणत्याही घटकास तसेच महिला बालकांना कायदेशीर न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सोशल मीडियामुळे सामाजिक जागृती वाढल्याने सैदव सतर्क चौकस राहवे, असे आवाहन केले.
यांचा झाला सन्मान
मानाची रिव्हालवर- राजु सांगळे, अहिल्यादेवी होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट इन द बॅच- उर्मिला जालिंदर खोत, सुरेंद्र पाटील, यांना सन्मानित करण्यात आले.
171 अधिकारी पोलिस सेवेत
दिक्षांत सोहळ्यानंतर 171 उपनिरिक्षक पोलिस दलात सहभागी झाले. यामध्ये 158 पुरुष 13 महिला अधिकारी प्रशिक्षण पुर्ण केले. या अधिकाऱ्यांना राज्यातील विविध पोलिस ठाण्यात प्रबोशन कालावधीसाठी पाठवण्यात आले.
नाशिकच्या भुमिपुत्राचे यश
ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले वडगाव ता. सिन्नर येथील राजु सांगळे हे तुकडीचे सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी ठरले. त्यांना मानाची रिव्हालवर, बेस्ट कॅडेट ऑफ स्टडीज, रिव्हालवर बटन, देत सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.