आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:डिसेंबरअखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया हाेणार पूर्ण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा शासनाचा मानस असून त्यातील अनुकंपा भरती प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया व २६ जानेवारी २०२३ रोजी नियुक्तीपत्रे दिले जातील, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा भरतीबाबत आढावा घेताना बैठकीत भुसे यांनी अनुकंपाधारकांना दिलासा दिला. प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करावी. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करून घोषित करावी. प्रत्येक विभागाने आपल्याकडील अनुकंपाची रिक्त पदे शैक्षणिक अर्हतेनुसार तपासून तातडीने भरावीत. जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, भागवत डोईफोडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...