आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई:संकटकाळात नुकसान भरपाई; शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ई-पीक पाहणी अॅप

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसान भरपाईसाठी मिळावाल यासाठी ‘ई-पीक पाहणी’प्रकल्प राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात ३८० पिकांची तर रब्बी हंगामात २६३ पिकांची आणि उन्हाळी हंगामात १८३ अशा ८२६ पिकांची नोंद झाली. सोयाबीन पिकाखाली २५ लाख ८८ हजार ४१३ हेक्टर क्षेत्र आहे ९ लाख ९१ हजार ९६४ हेक्टरवर हरभरा, १ लाख ९१ हजार ३३८ हेक्टरवर भात पीक घेण्यात आले आहे.

टाटा ट्रस्टच्या सहाय्याने ई-पीक पाहणी ॲपची निर्मिती केली आहे.जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंदणीची पद्धत आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येते. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. -वर्षा फडके आंधळे, मुंबई (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, वरिष्ठ सहायक संचालक)

बातम्या आणखी आहेत...