आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइ-सेल आयआयटीतर्फे हैदराबाद येथे इ-समिट चॅप्टरचे आयाेजन करण्यात आले. यात झालेल्या “इन द शूज ऑफ एन इन्व्हेस्टर’ स्पर्धेत सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघानेे इतर २२ स्पर्धक संघांपेक्षा सरस कामगिरी करून पाच हजारांचे प्रथम पारितोषिक मिळविले. विद्यार्थ्यांना उपांत्य फेरीत आयआयटी, मुंबई येथे सहभागी होता येईल.
लार्ड्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथे हा कार्यक्रम झाला. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप एक्स्पो, स्पीकर सेशन, नेटवर्किंग सेशन तसेच विविध प्रकारचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले होते. स्टार्टअप प्राेग्राम याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. त्यातून माेठ्या प्रमाणात उद्याेग उभे राहून त्यात युवकांना संधी मिळेल याचे सादरीकरण चॅप्टरमध्ये विद्यार्थ्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोखले शिक्षण संस्थेचे सचिव सर डाॅ. मो. स. गोसावी, डायरेक्टर एचआर डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे, प्राचार्य डाॅ. प्रफुल्ल कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. दीपक पाटील व महाविद्यालयाचे इ-सेल समन्वयक डॉ. संतोष अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांचे काैतुक केले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाली असल्याचे सर गाेसावी यांनी याप्रसंगी सांगितले.
हे विद्यार्थी सहभागी
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील अंतिम वर्षीय विद्यार्थी अथर्व निकम, भूषण कर्पे व तेजस मोरे यांना चॅप्टरमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.