आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा:अल्पसंख्याकांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत, त्यांना या परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळावी. यासाठी शासनाच्या वतीने ‘स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना’ राबविली जात आहे. या योजनेंतर्गत राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील केंद्रे तसेच पुण्यातील ‘यशदा’मधील केंद्रामध्ये नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यातील निवडक होतकरु अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या योजनेतून प्रशिक्षण दिले जात आहे.

बाैद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी आणि ज्यू समुदायांचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश होतो. या समुदायातील मुले या योजनेचा लाभ घेऊन केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये दाखल होऊ शकतात. तसेच पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनाही राबविली जाते. आता ही योजना निवासी स्वरूपात राबविली जाणार आहे. उच्च व्यावसायिक तसेच बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मॅट्रिकपूर्व तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचाही लाभ दिला जातो. या याेजनांद्वारे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी शासनाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...