आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्थेची उलाढाल:ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत तीन कोटींचा अपहार झाल्याची तक्रार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार संस्थेचे सभासद सदानंद कदम यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अपहार प्रकरणी सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा पत्रव्यवहार संस्थेच्या वतीने पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात येत असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, असे संस्थेमार्फत सांगण्यात आले आहे.

सिद्धिविनायक पतसंस्थेची उलाढाल सुमारे ७० ते ८० कोटींची आहे. लिपिक दिनेश शौचे हे संस्थेच्या खात्यातून नऊ महिन्यांपासून रकमा काढत असतानाही संस्थाचालकांना कुठलाही सुगावा लागला नाही, असे होऊ शकत नाही, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

तर कायदेशीर कारवाई करु पोलिस ठाण्यात शौचे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या सर्व प्रकरणात शौचे यांच्याव्यतिरिक्त इतर पदाधिकारी, संचालक किंवा इतर कर्मचारी कोणीही सामील नसून संस्थेचे लेखापरीक्षण सुरू असून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. - प्रशांत शेळके, मानद सचिव

बातम्या आणखी आहेत...