आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खेळणी दुरुस्तीच्या तक्रारीलाच झोका ;  अधिकारी म्हणतात, 250 रुपयेही नाहीत

इंदिरानगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी फाट्यावरील गामणे मैदानात असलेल्या खेळण्यांपैकी एक झोका वर्षभरापासून नादुरुस्त आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीचा खेळ चालवला आहे. सिडको विभागीय अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली असता २५० ते ३०० रुपयांच्या एका ‘क्लिप’साठी निधी उपलब्ध नसल्याचे अजब उत्तर नागरिकांना मिळाले. मनपात नगरसेवक नसल्याने तक्रार करण्याकरता लोकप्रतिनिधी नाही असी खंत नागरिक व्यक्त करत आहे.

किरकोळ खर्चासाठी निधी नाही?
झोक्याचा त्रिकोणी अँगल नाही तो बसवण्यासाठी खूप किरकोळ खर्च आहे ,परंतु त्यासाठी निधी नसणे ही शोकांतिका आहे.बाजूच्याच उद्यानास देखरेख करता लाखो रुपयाचे कंत्राट दिले जाते. यासाठी मनपा आयुक्तांनी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी. - दर्शन लढ्ढा, तक्रारदार

अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार
मनपा एकीकडे लाखो रुपये खर्च करतात पण बाल गोपाळांच्या मनोरंजनाच्या खेळणी दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने अजब नगराचा गजब कारभार म्हणावे की काय.
- संतोष भांदुर्गे, स्थानिक

दर्शन लढ्ढा यांच्या तक्रारीने झिजवले उंबरठे
२०​​​​​​​मे : ऑनलाइन तक्रार
२४ मे : विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्याकडून ऑनलाइन उत्तर ‘मनपाकडे खेळणी दुरुस्त करणेबाबत निधी उपलब्ध झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल’
२८ मे : तक्रार उद्यान अधीक्षक शिवाजी आमले यांच्याकडे गेल्याचे तक्रारदाराच्या पाठपुराव्यात निष्पन्न
२ जून : तक्रारीची दखल म्हणून आमले यांच्याकडून तक्रारदारास विभागीय अधिकाऱ्यांप्रमाणेच छापील उत्तर
४ जून : हीच तक्रार आता अपर आयुक्त सुरेश खाडे यांच्याकडे पोहोचली..

बातम्या आणखी आहेत...