आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाेदाकाठी सुशाेभीकरणांतर्गत टेंडरमध्ये संपूर्ण दगडांत ७६ दीपमाळा उभारण्यात येतील, असे दाखविले असताना प्रत्यक्षात त्या पाेकळ उभारल्या असून त्यात काॅंक्रीट भरल्याचा आराेप गाेदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासाठी सांडव्यावरील देवीमंदिराच्या येथील आणि त्र्यंबकेश्वरमधील दीपमाळांची पाहणी करून तशाच पुरातन दीपमाळांसरख्याच दीपमाळा या ठिकाणी उभारण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता पुरामध्ये या दीपमाळा वाहून जाण्याची शक्यता असल्याने या कामाच्या उच्चस्तरीय चाैकशीची मागणी जानी यांनी केली आहे.
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नाशिककर हैराण झाले असतानाच गाेदाकाठी सुशाेभीकरणांतर्गत हाेणाऱ्या विविध कामांबाबत नागरिकांसह विविध संस्थाकडून आक्षेप नाेंदविले जात आहेत. गोदावरी परिसरात सुशोभीकरणाच्या कामासाठी ताेडण्यात आलेल्या पुरातन पायऱ्यामुळे नाशिककरांकडून आंदाेलन देखील करण्यात आले हाेते. अशी परिस्थिती असताना आता रामकुंडसह गाेदाघाट परिसरात उभारल्या जाणाऱ्या दीपमाळांचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. टेंडर व पीपीटीमध्ये दाखविण्यात आलेले दीपस्तंभ हे दगडात बांधणे आवश्यक असते, मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करत क्रांॅकीटचे दीपमाळा उभारल्याचे जानी यांचे म्हणणे आहे.
बैठकीचा विसरच स्मार्ट सिटीच्या कामाचा निषेध करत नाशिककरांनी गाेदाघाटावर आंदाेलन केले हाेते. त्या पार्श्वभूमीवर ८ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र आठवडा उलटल्यानंतर अद्याप बैठक न झाल्याने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.