आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव मंजूर:पेठराेडच्या 4 किमी रस्त्याचे हाेणार कांॅक्रिटीकरण

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठरोडवरील साडेसहा किमीपैकी पहिल्या टप्प्यात ४ किमीच्या रस्त्याचे कांॅक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यामुळे खड्ड्यामधून वाहन चालवण्याच्या साडेसातीमधून काही अंशी मुक्तता मिळणार आहे. संपूर्ण रस्त्यांचे क्रांॅकिटीकरण करण्यासाठी ७१ काेटींची गरज असून पालिकेची आर्थिकस्थिती नाजूक असल्यामुळे तसेच जिल्हा नियाेजन समितीकडे निधी मागूनही मिळत नसल्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या शिलकी निधीमधून हे काम करण्यासाठी रस्ता वर्ग केला जाणार आहे.

दरम्यान, तांत्रिक तपासणीसाठी संबंधित प्रस्ताव लेखाधिकाऱ्यांकडे पाठवला असून त्यानंतर या संदर्भातील ठराव स्मार्ट सिटीकडे पाठवला जाणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी झालेल्या पेठरोडची प्रचंड दुरवस्था झाली असून गुजरातकडून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांकडून अक्षरश: नाके मुरडली जात आहे.

पालकमंत्र्यांच्या बैठकीत गाजला हाेता पेठराेडचा मुद्दा
पालिकेत पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीत पेठराेडच्या दुरवस्थेचा मुद्दा गाजला हाेता. या रस्त्यासाठीही निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांची वाढती आेरड लक्षात घेत स्मार्ट सिटीतून निधी मिळण्याबाबत मागणी ढिकले यांनी केली. त्यानुसार हा रस्ता पूर्ण करण्याची तयारी दाखवली असून त्यासाठी महासभेने प्रस्ताव मंजूर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...