आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यम् धनसंपदा:72 तासांत 50 बालकांवर यशस्वी मोफत हृदय उपचार; एसएमबीटी हॉस्पिटलचा उपक्रम

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित हृदयविकार शस्त्रक्रिया आणि उपचार शिबिरास 72 तासांत तब्बल 52 बालकांवर मोफत यशस्वी हृदय उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शिरपूर, साक्री व मालेगाव परिसरातील सर्वाधिक बालकांचा यात समावेश होता.

प्रशासनाने घेतली रुग्णांसह नातलगांची काळजी

विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शिरपूरहून धुळे आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल कॉरीडोर साकारण्यात आला. याद्वारे तात्काळ खासगी वाहनातून 62 बालकांसह नातेवाईकांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान, रुग्णांसह नातलगांची सर्वच काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आली.

मोफत केल्या तपासण्या

एसएमबीटी हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे व नंदुरबार नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. दर महिन्याला हॉस्पिटलकडून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यादरम्यान, बालकांसाठी मोफत तर प्रौढांसाठी अल्प दरात तपासण्या केल्या जातात.

तपासणीसाठी 248 मुलांची नोंद

ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 248 बालकांच्या पालकांनी नोंदणी केली होती. त्यातील 163 रुग्णांनी शिबिरात तपासणी करण्यात आली. यातील 65 बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम हॉस्पिटल) ने सहकार्य केले.

18 हजारापेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकार कक्ष हा स्वतंत्र विभाग रुग्णसेवेसाठी 24 तास कार्यात आहे. या विभागात गत 7 वर्षात ह्रदय विकारांवरील 18 हजारापेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

पालकांच्या प्रतिक्रिया

मुलीवर हृदयउपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मोठे टेन्शन आले होते. यानंतर आम्हाला एसएमबीटीचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांनी योग्य मार्गदर्शन मिळाले. यशस्वी उपचारानंतर माझ्या मुलीला नवा जन्मच दिला आहे.

- संतोष सोनवणे, यज्ञाचे वडील

पुतण्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद

पुतण्याला हृदयाचा त्रास होता मात्र डॉक्टरांनी मोठा खर्च या ऑपरेशनसाठी येणार असल्याचे सांगितले. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये शिबीर असल्याचे समजले. हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि ऑपरेशन झाले. माझ्या पुतण्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद होत आहे.

- रवींद्र पावरा, शिरपूर (जि. धुळे)

या महिन्यातही शिबिराचे आयोजन दर महिन्याला हृदय उपचार व शस्रक्रिया शिबिर चौथ्या शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात येते. बालकांस हृदयाचा त्रास असल्यास आणि मोफत उपचार करून घ्यावयाचे असल्यास एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करून घ्यावी.

शिरपूर-धुळे-धामणगाव कॉरीडोर

62 बालक व त्यांच्या नातलगांना मिळून 156 जणांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. ५२ बालकांवर यशस्वी मोफत उपचार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...