आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराणेनगर येथील जाजू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कब-बुलबुल, स्काउट-गाइड व आरएसपी एकदिवसीय शिबिर पार पडले. मान्यवरांच्या हस्ते स्काउट-गाइडचे ध्वजारोहण करण्यात आले. कब- बुलबुल, स्काउट-गाइड व आरएसपीची प्रार्थना घेण्यात आली. ध्वजगीत घेण्यात आले. स्काउट-गाइड व आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली.
नंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात तंबू सजावट, स्मरणशक्ती, रांगोळी, बिनभांड्यांचा स्वयंपाक, निबंध, चित्रकला या स्पर्धा घेण्यात आल्या. नंतर परिसरात श्रमदान करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्या नंतर विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. तसेच परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
संस्थेच्या चिटणीस चंद्रावती नरगुंदे यांंच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केला हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अजीज सय्यद हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय पाटील होते. कार्यक्रमाचा समारोप शेकोटीच्या कार्यक्रमाने करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमर खान पठाण सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक, देशपांडे, मनोज चव्हाण हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत बक्षिसे मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.