आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना मनस्ताप:राणेनगर बोगद्यात कोंडी ; पोलिस मात्र गायब

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकाेतील महामार्गालगत असलेल्या राणेनगर येथील उड्डाणपुलाखालील बोगद्यात वाहतूक कोंडी नित्याचीच समस्या झाली असून सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ऐन गर्दी व वाहतूक कोंडीच्या वेळी पाेालिस गायब असल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत वाहतूक कोंडी व अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून फळविक्रेत्यांसह इतर अतिक्रमण हटिण्यासाठी हनचालकांकडून केली जात आहे. सिडको व इंदिरानगरला जोडणारा महत्त्वाचा रस्ता राणेनगर बोगदा आहे. पुलाखाली व बोगद्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड आहे. समांतर रस्त्यावरून जाणारी व येणारी वाहने, अशी चार ठिकाणची वाहने समोरासमोर येतात.

वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. वाहतूक समस्या असताना वाहतूक शाखेच्या पाेलिसांकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. महामार्ग पूल उभारताना नियोजन नसल्याने पूल अरुंद झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

पाेलिसांची कारवाईवरच भर
याठिकाणी वाहतूक पाेलिस फळविक्रेते अथवा इतरांवर कारवाई न करता केवळ हेल्मेट नसल्याने त्याला पकडतात, तर इतरांना कारवाई करीत वसुलीवरच भर देतात. वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा वाहने अडवून त्यांना त्रास देतात
आशुतोष कदम

बातम्या आणखी आहेत...