आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकडेवारी:सावाना सदस्यपदाच्या मतमोजणीत घोळ ; पराभूत उमेदवार राजेंद्र जाधव यांचा आरोप; मिळविली अधिकृत आकडेवारी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीनंतर सदस्यपद मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ असून ४३८.६६ मतपत्रिका म्हणजेच ६५८० मतेच गहाळ असल्याचे ग्रंथालय भूषण पॅनलचे उमेदवार राजेंद्र जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात सावानातून अधिकृत माहिती मिळविल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता सावानावर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत दोन दिवसांनी लेखी पत्राद्वारे स्पष्टीकरण देतो असे सांगितले. सार्वजनिक वाचनालयाच्या १८ जागांसाठी रविवारी (दि. ८) मतदान पार पडले. त्यात सोमवारी (दि. ९) अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके आणि उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. सुनील कुटे आणि वैद्य विक्रांत जाधव निवडून आले. तर मंगळवारी (दि. १०) सदस्यपदाच्या १५ जागांसाठी मतमोजणी झाली. त्यात ग्रंथालय भूषण पॅनलचे १२ आणि ग्रंथमित्र पॅनलचे ३ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत एकूण ३९०५ सभासदांनी मतदान केले. ३४२ मते बाद झाली तर ३५६३ मते वैध ठरली. ३५६३ मतपत्रिका गुणिले १५ मते म्हणजेच ५३४४५ एवढे एकूण मतदान सदस्यपदासाठी व्हायला हवे, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. शंकरराव सोनवणे यांनी मतमोजणी दरम्यान वेळोवेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदान ४६८६५ एवढेच होते. म्हणजे तब्बल ६५८० मतांचा फरक येतो. मग ही मते गेली कुठे असा प्रश्न जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सावनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. फडके यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.

बातम्या आणखी आहेत...