आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Congress In Support Of Bilkis Bano | Letter Of Signatures Of Thousands Of Citizens To Be Sent To President Draupadi Murmu | Demanding Justice

बिल्कीस बानोंच्या समर्थनात काँग्रेस मैदानात:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पाठवणार हजारों नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र, न्यायाची मागणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ऐन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा करताना सोडून देण्यात आले. बिल्कीस बानोवर अन्याय झाल्याची भावना संबंध देशात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे.

कुठल्याही आरोपीला जात, धर्म नसतो. तो आरोपीच असतो, म्हणूनच नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी वाकडी बारव याठिकाणी बिल्कीस बानोंच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र

मोहिमेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात दीड हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत विरोध दर्शवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात येणारे निवेदन हे हिंदीत असून सुरुवातीला देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शुभेच्छा देत. बिल्कीस बानोला आपण न्याय द्यावा आणि आमची न्यायाची अंतिम अपेक्षा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची दया न दाखवता शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रपती यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन बानो कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी योग्य ते आदेश देणे गरजेचे आहे.

घटना दुर्दैवी

या प्रकरणानंतर सर्वसामान्य माणसांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. न्यायव्यवस्था आणि कायद्यावरील अंकुश कमी होऊ नये यासाठी तपास यंत्रणेपासून तर न्यायालय लढाईपर्यंत चा घटनाक्रम लक्षात घेण्यात यावा, तसेच घडलेली घटना या अत्यंत दुर्दैवी असताना त्या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने एक प्रकारे धक्काच बसला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी ज्ञानेश्वर काळे, ईशाक कुरेशी, हनिफ बशीर, अशोक शेंडगे, जावेद शेख, अमोल सोनवणे, दिलावर मनिय्यार, युसुफ शेख, जहीर अत्तार, अॅड विकास पाथरे, विलासराज बागुल तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम बिग्रेडचे अजिज पठाण, मुस्ताक नेता आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...