आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात काँग्रेस आक्रमक:ईडी-सीबीआय यंत्रणांचा गैरवापर, महिनाभरात तिसरे आंदाेलन; अनेक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची दांडी

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात नाशिक शहर कॉंग्रेसच्या वतीने शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन येथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारकडून ईडी, सीबीआय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने शुक्रवारी सकाळपासून संसदपासून ते रस्त्यापर्यंत निदर्शने केली. नाशिकमध्येही केंद्र सरकारच्या नियाेजनशून्य कारभार व जीएसटीतील दरवाढीमुळे सर्व सामान्यांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. महागाईने नागरिक त्रस्त झालेले असताना सरकारकडून कुठल्याही उपाययाेजना केल्या जात नाहीत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करून ते 1100 रूपयांवर पाेहचले आहेत. याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

अग्निपथ योजना रद्द करा

एकीकडे महागाई आणि दुसरीकडे तरुण पिढी बेरोजगार होत राेजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. मोदी सरकारने घाईघाईने आणलेली अग्निपथ योजना युवकांचे भवितव्य अधांतरी करण्याचे काम करीत असून त्याबाबत पृर्णविचार करुन ही योजना रद्द करण्याची मागणी व जीवनाश्वक वस्तूंवरील जीएसटी तातडीने रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे आंदाेलनस्थळी नसणारे नगरसेवक, पदाधिकारी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी उपस्थित राहून छायाचित्रात चमकले.

हुकूमशाहीचे धोरण

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी सरकार जाणून बुजून वाढत्या महागाई विरोधात काहीही बोलत नसून संसदेत बोलू पाहणाऱ्यां विरोधात कारवाई करत असल्याचा आरोप केला. हे अयोग्य आणि हुकूमशाहीचे धोरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यांची उपस्थिती

आंदाेलनात माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, वसंत ठाकुर, जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, सुरेश मारु, राजेंद्र बागुल, राहुल दिवे, नीलेश खैरे, हनिफ बशीर, ज्युली डिसुझा, ईशाक कुरेशी, विजय पाटील, आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...