आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये काँग्रेसचा मेळावा:प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरातांची प्रमुख उपस्थिती, विशेष पदयात्रेचे आयोजन

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले व विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी 31 जुलैला दुपारी 3 वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या यशस्विततेसाठी सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी बैठकीत केले.

शहर काँग्रेस कमिटीत शनिवारी (दि. 30) झालेल्या बैठकीत पक्षाचे सहप्रभारी ब्रीज दत्त यांनी मेळाव्याची माहिती दिली. तर आहेर यांनी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 'आझादी की गौरव पदयात्रा' निमित्ताने पंचवटीतून गांधी ज्योत येथून या पदयात्रेला सुरुवात होईल. याच काळात नाशिक शहरातील सर्वच प्रभागातून 75 किलोमीटर अंतर सर्वच नेते, पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

झेंडे लावून वातावरण निर्मिती

स्वातंत्र्य चळवळीत योगदान असलेल्या कुटुंबीयांच्या भेटी देखील घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वांतंत्र्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाला भेटी दिल्या जातील. चौकाचौकात पत्रक, बॅनर, झेंडे लावुन वातावरण निर्मिती केली जाईल यावर पदाधिकाऱ्यांनी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

मेळाव्याची जय्यत तयारी

प्रदेशाध्यक्ष पटोले व थोरात यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी करुन अधिकाधिक लोकांना ह्या मेळाव्यात सहभागी करावे असे ब्रीज दत्त यांनी सांगितले ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी डॉ शोभा बच्छाव, शाहु खैरे, वत्सला खैरे, राहुल दिवे, सुरेश मारु, विजय राऊत, वसंत ठाकुर आदींची उपस्थिती होती.

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव शहर काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. याबाबतचा ठराव शरद आहेर यांनी मांडला तर सर्वच पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून ठरावाला अनुमोदन दिले.

बातम्या आणखी आहेत...