आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन; राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना धमकी देणाऱ्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने भद्रकाली पोलिस स्टेशन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्यसभेची विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांना कर्नाटक मधील चित्तूर विधानसभेचे उमेदवार आणि स्थानिक आमदार माणिक कम राठोड यांनी जीवे मारण्याची धमकी एका फोन द्वारे दिली, या विरोधात नाशिक येथे शहर काँग्रेस वतीने आंदोलन करण्यात आले.

त्यासाठी अशा भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीवर त्वरित गुन्हा दाखल व्हावा म्हणून काँग्रेस पक्षातर्फे तक्रार देण्यात आली. शहराध्यक्ष अध्यक्ष आकाश छाजेड व माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, प्रदेश सचिव नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली भद्रकाली पोलीस स्टेशन येथे ही तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीमध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजे सर्व काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांना मानसिक धक्का पोहोचवणारी घटना आहे देशाच्या विविध भागात अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नाशिक शहरातही या भाजपा आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांना विनंती केली.

याप्रसंगी नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, नगरसेविका आशा तडवी, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष अल्तमश शेख, नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, नाशिक शहर अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष संतोष ठाकूर, सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नाशिक शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार,जावेद इब्राहिम,नंदकुमार कर्डक, सोशल मीडिया प्रमुख जुली डिसोझा, प्रकाश खळे, इसाक कुरेशी, देवेंद्र देशपांडे, नितीन अमरुतकर, सचिन दीक्षित,टिपू रजा,अमोल मरसाळे, नदीम शेख, गणी शेख,मनीष राऊत,दाऊद शेख,नितीन काकड आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.