आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय भारत सत्याग्रह आंदोलन:राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची सही मोहीम, नागरिकांचा मोठा सहभाग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ जिल्हा कॉँगेस अनुसूचित जाती विभागाने शहरभर सही माेहीम राबवली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.

नाशिक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने इंदिरा गांधी पुतळा, शालीमार, नाशिक येथे हे आंदाेलन करण्यात आले. शहर कॉंग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी सह्यांची मोहीम राबविली.

"माेदी हटाव देश बचाव"

यावेळी सहयाबरोबर काही प्रतिक्रिया देखील नोंदविण्यात आल्या त्यात प्रामुख्याने ' मोदी हटाव, देश बचाव, बेरोजगारांना रोजगार द्या, शेतकऱ्यांचा मालाला भाव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, स्वधार योजनेची रक्कम त्वरित अदा करा, महागाई कमी करा, महागाई कमी करा, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा अश्या एकानानेक प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.

यावेळी अॅड आकाश छाजेड, डॉ हेमलता पाटील, रमेश कहाडोळे, वत्सला खैरे, राजेंद्र बागुल, नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बबलु खैर, वसंत ठाकुर, अल्तमश शेख, विजय पाटील, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी काँगेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. स्वाक्षरीची माहिती व्यापार स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.