आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदाराचा अभिप्राय:मतदान यंत्र की मतपत्रिकांद्वारे?, काँग्रेस सेवादल 10 हजार नागरिकांचे करणार सर्वेक्षण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असाेत की लाेकसभा, विधानसभा निवडणुका त्यांचे मतदान इव्हीएम यंत्रावर घेतले पाहिजे की मतपत्रिकांवर, असा प्रश्न उपस्थित करून सर्वेक्षणात एक माहितीपत्रक व प्रश्नावली सुमारे १० हजार नागरिकांकडून लेखी स्वरूपात भरून घेण्याचे अभियान काँग्रेस सेवादलातर्फे महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात आले आहे.

शहर काँग्रेस सेवादलातर्फे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावे, वेगवेगळ्या अभियानामार्फत नागरिकांपर्यंत पाेहाेचता यावे यासाठी उपक्रम हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सेवादल शहराध्यक्ष डाॅ. वसंत ठाकूर यांनी नवीन उपक्रम हाती घेतला अाहेत. शहरातील मतदारांना काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी मतदारांना पत्रक देऊन त्यावर मतदारांनी आपले मत यासंदर्भात हो किंवा नाही, असे मांडायचे आहे.

या पत्रकावर संबंधित मतदाराचे नाव व मोबाइल नंबर घेऊन संपूर्ण नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील १० हजार मतदारांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभारी शहराध्यक्ष आकाश छाजेड, उल्हास सातभाई, माजी नगरसेविका वत्सला खैरे, राजेंद्र बागूल, आशा तडवी, लक्ष्मण धोत्रे, स्वाती जाधव, बबलू खैरे, जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, सिडको अध्यक्ष अशोक लहांगे उपस्थित होते.