आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रोक्त पद्धतीने पूजन:चिन्मय आश्रमात १०८ कलशाने अभिषेक

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटीतील चिंचबनातील चिन्मय मिशन आश्रमात श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा अठराव्या वर्धापन दिनानिमित्त १०८ जलकलशांनी मूर्तींना अभिषेक करण्यात आला. गोदावरी नदीचे जल १०८ कलशात आणून शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले.

चिन्मय चेतना आश्रमाचे आचार्य स्वामी अद्वैतानंद यांनी सुमधुर गायन करीत प्रवचनाद्वारे भाविकांना मार्गदर्शन केले. सकाळी आठ वाजता कलशधारी भाविकांची शोभायात्रा निघाली. यावेळी कलश, पिवळ्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि पांढरा पोषाख घातलेले पुरुष, सवाद्य मिरवणुकीने निघाले. चिंचबन, हनुमान, शिवाजी पुतळा, मालेगाव स्टॅन्ड अशी प्रभात फेरी काढण्यात आली. पूजा, अभिषेकानंतर आरती व महाप्रसाद झाला. हा उत्सव यशस्वितेसाठी चिन्मय मिशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...