आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैवविविधता वाढीसाठी भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे संवर्धन हीच काळाची गरज आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास थांबून रक्षण केले जाईल. त्यासाठी आपण सर्वांनी “झाडे लावा, झाडे जगवा” याप्रमाणे काम करावे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अंबड व विजयश्री सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुसमाडी पॅटर्नच्या कामाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कुसमाडी पॅटर्न हा वृक्षसंवर्धनाचा १०० टक्के यशस्वी होणारा प्रकार आहे. ज्यामध्ये मोठ्या बॅगमध्ये १८ प्रकारचे कंपोस्ट एकत्रित करून छोटे रोप लावले जाते व ते ३६ महिन्यांपर्यंत घराच्या किंवा इमारतीच्या परिसरात त्या बॅगमध्ये वाढवून नंतर योग्य जागी ते झाड लावले जाते. रोटरी क्लब ऑफ अंबड व विजयश्री सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कुसमाडी पॅटर्नची हजार झाडे बनवण्याचे काम चालू आहे. त्यातील पहिल्या झाडाच अनावरण हे आयुक्त पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, डॉ. आवेश पलोड, नमामि गोदा संस्थेचे अध्यक्ष राजेश पंडित, पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील, सरपंच दत्तू ढगे, विजयश्री सेवा संस्था अध्यक्ष मनोज साठे, सुधाकर जाधव जयंत पवार, मंगेश साकोरीकर, डॉ. धनंजय अहिरे, नितीन थोरात आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.