आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

133 यज्ञकुंडांचे बांधकाम:ओझरला एकाच दिवसात 33 यज्ञकुंडांची उभारणी

ओझर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या ३३ व्या पुण्यस्मरणार्थ चार जिल्ह्यांत राष्ट्रनिर्माण धर्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात आयोजित यज्ञासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका दिवसात ३३ यज्ञकुंडांचे बांधकाम करण्यात आले. याप्रमाणे चार जिल्ह्यांत मुख्य यज्ञकुंडासह १३३ यज्ञकुंडांचे निर्माण करण्यात आले. ओझर येथे होणाऱ्या यज्ञासाठी एकाच दिवसात ३३ यज्ञकुंडांचे बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्यात आले.

आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जगद‌्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नगर अशा चार जिल्ह्यांत २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान राष्ट्रनिर्माण धर्मसोहळ्याचे आयोजन केले आहे. यात जपानुष्ठान-संस्कार शिबिर, यज्ञ, अभिषेक, अखंड नंदादीप, भागवत पारायण, नामसंकीर्तन, हस्तलिखित नामजप यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यज्ञासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका दिवसात ३३ कुंडांचे बांधकाम करण्यात आले. याप्रमाणे चार जिल्ह्यांत मुख्य यज्ञकुंडासह १३३ यज्ञकुंडांचे निर्माण करण्यात आले. ओझरला एकाच दिवसात ३३ यज्ञ कुंडांचे बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...