आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जलाराम ट्रस्टकडून ५ मजली भक्तनिवासाची उभारणी सुरू

सचिन जैन | नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थक्षेत्रासह सिंहस्थनगरी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये राेजच शेकडाे भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या निवाऱ्याची साेय व्हावी, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जलाराम सत्संग चॅॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाच मजली वातानुकूलित भक्तनिवास उभारले जात आहे. या भक्तनिवासाच्या माध्यमातून एकाचवेळी १०० भाविकांना राहता येणार आहे.

श्री जलाराम सत्संग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शहरात धार्मिक विधी, दर्शनासाठी राेजच हजाराेंच्या संख्येने भाविक येत असतात. देशभरातून येणाऱ्या भाविकांना अनेकदा याेग्य माहिती न मिळाल्याने राहण्याची माेठी अडचण हाेते. विशेषत महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना यांचा माेठा त्रास हाेताे. हीच बाब हेरत श्री जलाराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुढाकार घेत पंचवटीतील केवडीबन परिसरात भव्य पाच मजली भक्तनिवास उभारले जात आहे. विशेष म्हणजे हे भक्तनिवास संपूर्ण वातानुकूलित असणार असून हाॅटेलप्रमाणे प्रत्येक रूममध्ये सुविधा राहतील. पाच मजल्यांवर १८ रूम व दाेन हाॅल असणार असून विविध कार्यक्रम, सत्संगदेखील या ठिकाणी करता येणार आहे.

या भक्तनिवासासाठी भाविकांकडून केवळ नाममात्र दर आकारले जाणार आहेत. शहरात येणाऱ्या भाविकांंना काेणत्याही प्रकारे निवासाची अडचण हाेऊ नये, त्यांची गैरसाेय हाेऊ नये या दृष्टीने हे भक्तनिवास उभारण्यात आले असून पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण हाेणार आहे. या भक्तनिवास उभारणीच्या कामात श्री जलाराम सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

मंदिरामध्ये वर्षभर असते भाविकांची वर्दळ
केवडीबन मंदिर परिसरात असलेल्या जलाराम मंदिरात दर्शनासाठी वर्षभर भाविक माेठ्या संख्येने येत असतात. भक्तनिवासामुळे या ठिकाणासह शहरात येणाऱ्या भाविकांना माेठी मदत हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...