आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमाल विदेशात नेण्याची साेय:राष्ट्रीय महामार्गासह जेएनपीटीकडून ड्रायपोर्टची उभारणी निफाडलाच; काही वर्षांपासून ड्रायपोर्ट प्रकल्प होता प्रलंबित

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल जलद गतीने देश विदेशात पोहोचविता यावा यासाठी ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग आता काहीसा मोकळा झाला आहे. राज्यात खूप आयसीडी ( इंटिग्रेटेड कंटेनर डेपो) असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये होता. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने सहमती दर्शविल्याने ड्रायपोर्ट प्रकल्प निफाड येथे उभारण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येणार आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतीमाल मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असतो. यामध्ये भाजीपाल्यासह द्राक्ष,कांदा,डाळिंब आदी मालाचा समावेश आहे. उत्पादित शेतीमाल विक्रीसाठी जलदपणे देश-विदेशात पोहाेचविता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या निफाड कारखाना येथील जागेवर विविध कर थकीत आणि कर्ज असल्याने या जागेवर प्रकल्प होणे अवघड वाटत होते. यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रकल्प उभारण्यासाठी नियोजित जागेवर काही अडचण येत असल्यास प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून शिलापूर आणि मुंडेगाव येथील जागा सुचविल्या होत्या. परंतु राज्यात आयसीडी (लोड कंटेनर डेपो )खूप असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये मोडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून ड्रायपोर्ट प्रकल्प प्रलंबित होता.

परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट पुढे सरसावले आहे. मल्टिमॉडल औद्योगिक पार्कने (एमएमआयपी )ठरवले तर आयसीडी म्हणून ते नाशिकला वगळण्याची परवानगी राज्याकडून मिळवू शकतात. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट (एनएचएलएम) नॅशनल हायवेची कंपनी असून काही दिवसांपूर्वी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने जेएनपीटीला पत्र लिहीत आपण सोबत काम करून नाशिक येथे ट्रायपोर्ट उभारू, अशी विनंती केली होती. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीच्या प्रस्तावास नुकतीच जेएनपीटीने सहमती दर्शविली आहे. शिपिंग मंत्रालयास सहमतीबाबतची माहिती कळविल्याने या मंत्रालयाचे अधिकारी लवकरच निफाडचा दाैरा करून पुढील प्रक्रिया सुरू करतील अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे.

शिपिंग मंत्रालयास माहिती
सहमतीची माहिती जेएनपीटीने शिपिंग मंत्रालयाला कळविली आहे. यामुळे निफाड येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...