आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा कंपनीला ग्राहक न्याय मंचचा दणका:मृताच्या वारसाला विमा नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला 15 लाख देण्याचे आदेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृताच्या वारसाला विमा नाकरणाऱ्याना आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायालयाने वारसाला 15 लाखांचा विमा तत्काळ देण्याचे आदेश दिले. या आदेशाने ग्राहक न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे आणि सदस्यांनी हा महत्वपुर्ण निकाल दिला.

ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, तक्रारदार नरेंद्र कचरु गुमाने रा. कंजरवाडा नंदुरबार यांनी ग्राहक न्यायमंचामध्ये विमा कंपनीच्या विरोधात तक्रार केली होती. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून भाऊ सुरज कचरु गुमाने यांनी 2013 मध्ये जीवन विमा पाॅलिसी घेतली होती. या पाॅलिसीला नरेंद्र गुमाने हे वारस लावले होते. 2015 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

विमा पाॅलिसीचा लाभ मिळण्यासाठी त्यांना कंपनीकडे दावा दाखल केला होता. मात्र कंपनीकडून विमा प्रपोजल फाॅर्म मध्ये इतर पाॅलिसीबाबात माहिती उघड केली नसल्याच्या कारणातून विमा नाकरला होता. विमा धारकाने कुठलीही माहिती लपवली नसतांना गुमाने यांनी कंपनीच्या विरोधात 15 लाखांचा विमा व्याजासह मिळावा याकरीता दावा दाखल केला होता. न्यायमंचाने दोन्ही पक्षाची युक्तीवाद एकून घेतला. विमा कंपनीच्या वतीने वकिल गैरहजर राहिले. न्यायमंचाने विमा कंपनीने सेवा देण्यात कमतरता केली असल्याचा निष्कर्ष काढत तक्रारदार यांना 15 लाखांचा विमा व्याजासह देण्याचे आदेश दिले.

अशी होती तक्रार

तक्रारदार यांच्या भावाने 30 सप्टेंबर 2013 रोजी जीवन विमा पाॅलिसी घेतली होती. या पाॅलिसीला तक्रारदार यांचे भाऊ वारसदार होते. 28 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

कंपनीने या कारणामुळे नाकरला विमा

विमाधारकाने प्रपोजल फाॅर्म मधील फार्ममध्ये इतर पाॅलिसीबाबत असलेली माहिती उघड केली नाही. या कारणास्तव त्यांचा विमा दावा नाकरला होता.

न्यायमंचाचा निष्कर्ष

न्यायमंचाच्या निष्कर्षनुसार, कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा दावा नाकारुन ग्राहक सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. विमा कंपनीला अशा प्रकारे विमा नाकरता येत नसल्याने तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र असल्याचा निष्कर्ष नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...