आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे आरोग्य‎ धोक्यात:अशोका मार्ग परिसरात दूषित पाणीपुरवठा‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शहरातील अशोका मार्गासह काही‎ भागात गढूळ पाणीपुरवठा होत‎ असल्याने रहिवासी हवालदिल‎ झाले आहेत. गढूळ पाण्याची तक्रारी‎ वाढत असून, यामुळे रोगाचा प्रसार‎ अधिक होत आहे. शहरात‎ ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा‎ होत असल्याची तक्रार बहुतांश‎ रहिवाशांकडून केली जात आहे.‎ शहरातील अशोकामार्ग,‎ वडाळारोड, पखालरोड, काटे‎ गल्ली, जुने नाशिक, इंदिरानगर,‎ विनयनगर, जयदीपनगर, सातपूर‎ भागात गेल्या काही दिवसांपासून‎ दूषित पाणीपुरवठा होत आहे. या‎ भागातील ड्रेनेजमधून पिण्याच्या‎ पाण्याची पाइपलाइन गेल्याने हा‎ प्रकार सुरू झाला आहे.

या‎ पाण्यामुळे स्थानिकांना विविध‎ आजारांना सामोरे जावे लागत आहे.‎ तर गेल्या काही दिवसांपासून‎ शहरात काविळीचे ही रुग्ण वाढले‎ आहे. काही दिवसांपासून जुने‎ नाशिकसह पूर्व भागात दूषित‎ पाणीपुरवठा होत असल्यामुळे या‎ भागातील नागरिकांचे आरोग्य‎ धोक्यात आले आहे.‎ महापालिकेच्या ढिसाळ‎ कारभारामुळे रुग्णांची संख्या वाढत‎ आहे. शहरातील खासगी व‎ महापालिकेच्या रुग्णालयात‎ उलट्या, जुलाब, टायफॉइड,‎ अतिसार, अचानक ताप येणे आदी‎ विकारांचे रुग्ण उपचारांसाठी दाखल‎ होत आहे. दूषित पाण्यामुळे रुग्णांचा‎ हा आकडा वाढतच असल्याची ही‎ चर्चा नागरिकांमध्ये आहे.‎

बातम्या आणखी आहेत...