आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदान:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाज‎ संचलित कर्मवीर बाबुराव गणपतराव‎ ठाकरे अभियांत्रिकी‎ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी‎ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या‎ ब्रीदवाक्याचा वारसा घेत दरी येथे‎ श्रमदान शिबिरात कार्य केले.‎ सावित्रीबाई फुले अंतर्गत‎ चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना‎ अंतर्गत श्रमदान शिबिराचा दुसरा‎ दिवस दरी या गावात पार पडला.‎

नियोजित वेळापत्रकानुसार श्रमदान‎ शिबिराच्या प्रतिनिधींच्या‎ मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात‎ आले. पाणी आडवा, पाणी जिरवा‎ या योजनेंतर्गत गावाच्या कडेच्या‎ डोंगरावर सरळ समतल विद्यार्थ्यांनी‎ अतिशय जिद्दीने बांधले. जेणेकरून‎ पावसाचे पाणी वाहून न जाता‎ जमिनीत मुरेल व गावाच्या पाण्याच्या‎ पातळीत मोठी वाढ होईल. नेहमी‎ ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत‎ असल्यामुळे म.वि.प्र संस्थेने हे धोरण‎ हाती घेतले आहे. दुपारच्या सत्रात‎ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश‎ जेजूरकर यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...