आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:नाशकात सोनोग्राफी मशीनसह वैद्यकीय अधिकाऱ्याची वादग्रस्त प्रॅक्टिस ‘स्कॅन’

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीगाव येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढळले असून धक्कादायक बाब म्हणजे हे हॉस्पिटल महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक तसेच आत्ताचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांचे आहे. पालिकेत असताना खासगी प्रॅक्टिस करण्यास बंदी असूनही येथे भंडारी यांचा फलक लागल्यामुळे महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरू केली आहे. सोमवारी (२१) अहवाल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे जाणार आहे.

कोराेनात दिले खासगी संस्थेला हॉस्पिटल : हे हॉस्पिटल डॉ. भंडारी यांचे होते. कोरोनात त्यांनी ट्रु हेल्थ केअर या संस्थेला दिले. या संस्थेने पालिकेकडे नोंदणी केली. कालांतराने त्यांनी स्वतःची नोंदणी रद्द केली. त्यानंतर डॉ. सुनीता भंडारींनी स्वतः रुग्णालय चालवण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे.

तिथे प्रॅक्टिस करत नाही; रुग्णालयाचा मालक : भंडारी पालिका सेवेत येण्यापूर्वी हे रुग्णालय मी घेतले असून सेवेत आल्यानंतर ते खासगी संस्थेला चालवण्यासाठी दिले. मालक म्हणून माझा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे. सोनोग्राफी मशीन हे मी ज्यावेळेस रुग्णालय घेतले, तेव्हापासून असून २००६ मध्येच बंद केल्याची माहिती पालिकेला कळवली आहे, असे डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...