आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:सिव्हिलमध्ये परिचारिका आणि प्रशासनात वादावादी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हिल हाॅस्पिटल मेडिकल काॅलेजला करारावर वापरास दिल्यानंतर मेडिकल प्रशासन आणि सिव्हिलच्या परिचारिकांमध्ये वाद सुरू झाला आहे. यात अतिरिक्त शल्यचिकित्सकांकडून परिचारिकांच्या कामकाजात हस्तक्षेप वाढत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे. गुरुवारी परिचारिकांच्या शिष्टमंडळाने शल्यचिकित्सकांची भेट घेत काम बंद करण्याचा इशारा दिला.

जिल्हा रुग्णालय शासकीय मेडिकल काॅलेज प्रशासनास करारावर दिले आहे. रुग्णसेवा मेडिकल काॅलेज आणि प्रशासकीय कामकाज सिव्हिल प्रशासनाकडे आहे. अतिरिक्त शल्यचिकित्सकांकडून बाह्यरुग्ण विभागातील काही कंत्राटी परिचारिकांची ड्युटी लावण्यासाठी हस्तक्षेप होत असल्याने कायम सेवेत असलेल्या परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली.

रुग्णालयातत इतर बरेच मुद्दे आहेत. याकडे लक्ष न देता परिचारिकांच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने परिचारिकांनी काम बंद करण्याचा इशारा दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी परिचारिकांची समजूत काढत वाद मिटवला असला तरी परिचारिकांनी नाराजी कायम असून संघटनेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...