आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:सहकार, लेखा पदविका, गृहनिर्माण संस्था व्यवस्थापनाचा निकाल जाहीर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार विभागामार्फत मे २०२२ मध्ये शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा आणि सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आल्या. त्या परीक्षांचा निकाल घोषित करण्यात आला आहे. संकेतस्थळावर यादीही जाहीर करण्यात आली आहे. परीक्षार्थींना वरील परीक्षांचे निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.अंॅड ए. मंडळ येथे लॉगइन पासवर्ड वापरून उपलब्ध होणार आहेत. फेरगुणमोजणी करण्यासाठी परीक्षार्थींना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत याच संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतील. फेरगुणमोजणी करण्यासाठी परीक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी रुपये ७५ अधिक बँक चार्जेस याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२२ रात्री १०.३० वाजेपर्यंत चलनाने भरणे आवश्यक आहे.

भरणा करण्यात आलेले चलन बँकेत ३ जानेवारी २०२३ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नसल्याचेही डॉ. सतीश खरे यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांना महिनाभरापासून या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा हाेती.

बातम्या आणखी आहेत...