आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढल्याने दरात घसरण:काेथिंबिर जुडी100 वरून 20 रुपयांवर​​​​​​​

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा अधिकचा पाऊस झाल्याने पालेभाज्यांची आवक घटून त्यांचे दर गगनाला भिडले हाेते. यामध्ये काेथिंबिरीच्या जुडीचा शेकडा दर १९ हजारावर गेल्याने ग्राहकांना किरकाेळ बाजारात ९० ते १०० रुपयांना काेथिंबिरीची जुडी खरेदी करावी लागली. मात्र, गेल्या दाेन दिवसांपासून नाशिक बाजार समितीत काेथिंबिरीची आवक वाढल्याने घाऊक आणि किरकाेळ बाजारात काेथिंबीरचे दर घसरले आहेत. ग्राहकांना १५ ते २० रुपयांच्या जुडी मिळत आहे.

नाशिक बाजार समितीत गुरुवारी (दि. १०) सुमारे ६२ हजार काेथिंबिरीच्या जुड्या विक्रीसाठी आल्या. साधारणत: दरराेजच्या आवकपेक्षा २० ते २५ हजार जुड्यांची आवक जादा झाली. ही जादा आवक झाल्याने व्यापाऱ्यांकडून १ हजार ते ३ हजारचा दर मिळाला. गेल्या महिन्यापर्यंत यंदा पाऊस झाल्याने पालेभाज्यांसह अन्नधान्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

कांदा, टाेमॅटाेचेही नुकसान झाल्याने त्यांच्याही दरात वाढ हाेऊन ग्राहकांना फटका बसत आहे. शेतकऱ्यांनाही माेठ्या प्रमाणात नुकसान साेसावे लागत आहे. त्यातच ज्यांचा भाजीपाला पाण्यातून वाचला, त्यांना जादा भाव मिळाल्याने इतर शेतकऱ्यांनीही काेथिंबीर उत्पादनालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरची आवक मंदावली असल्याने दिवाळीच्या काळात शेकडा १९ ते २० हजारांपर्यंत दराने विक्री झाली होती.परंतु सध्या बाजार समितीमध्ये आवक वाढली असल्याने गुरुवारी एक हजार ते तीन हजार रुपये प्रतिशेकडा दराने विक्री झाली. गत महिन्यात कोथिंबीरची दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवडीला प्राधान्य दिले होते. सध्या बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने दरातही घसरण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...