आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांकडून चौकशीचे आदेश:ॲडमिट कोरोना रुग्णच उचलून आणला आंदोलनासाठी पालिकेत; जीवाशी खेळ; निव्वळ स्टंट की वस्तुस्थिती याबाबत घेणार शोध

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ॲडमिट रुग्णाला पालिकेत आणले : फौजदारी कारवाई सुरू

काेराेनाबाधित रुग्णांचा कळवळा करत त्यांना बेड मिळवून देण्यासाठी महापालिकेला जाब विचारण्याच्या नादात सामाजिक भान विसरून रुग्णालयात अॅडमिट रुग्णाला तसेच दुसऱ्या रुग्णाची अाॅक्सिजन लेव्हल केवळ ३५ टक्के असताना त्याला राजीव गांधी भवनच्या पायऱ्यांवर खुर्चीत अाॅक्सिजन सिलिंडर लावून बसविणे म्हणजे त्या बाधित रुग्णांच्याच नव्हे तर त्यांच्या संपर्कात अालेल्या अाणि अासपास असलेल्या सगळ्यांच्या जीवाशी खेळ करत सामाजिक कार्यकर्ते दीपक डाेके यांनी बुधवारी (दि. ३१)अांदाेलनाची एकप्रकारे स्टंटबाजीच केली. याबाबत चाैकशी करुन वस्तुस्थिती बघून संबंधितांवर कठाेर कारवाई करण्याचा इशारा पालिका अायुक्त कैलास जाधव यांनी दिला अाहे.

महापालिकेच्या बिटकाे तसेच डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयात किंबहुना जिल्हा रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे कारण देत डाेके यांनी सिडकाे येथून दाेन काेेराेनाबाधित रुग्णांना थेट पालिका प्रवेशद्वारावर अाणत ठिय्या मांडला. पालिका प्रवेशद्वारावरच रुग्ण अाल्याचे बघून प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बाेलावून दाेन्ही रुग्णांना बिटकाे रुग्णालयात दाखल केले.

अॅडमिट रुग्णाला पालिकेत आणले : फौजदारी कारवाई सुरू
बेड मिळत नसल्यामुळे पालिका प्रवेशद्वारावर आणल्या गेलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांपैकी एका रुग्ण सिडकोतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची बाब पालिकेच्या चौकशीत समोर आली. या रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो पुन्हा सिडकोतील खासगी रुग्णालयात गेल्यामुळे आयुक्त जाधव यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अत्यंत संसर्गजन्य कोरोना परिस्थिती असताना अशा पद्धतीने आंदोलनासाठी संबंधित रुग्णाचा वापर केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी कारवाई करण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा अधिकारी शिंदे यांना पाठविल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. आता, प्रशासनाला बदनाम करण्याऱ्या आंदोलनाचा बोलवता धनी कोण याचा शोध पालिका घेत आहे.

हे चुकीचेच...
काेराेनाबाधीत रुग्णांना बेड मिळत नसेल तर त्यांच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने त्यांना पालिका प्रवेशद्वारावर अाणून अांदाेलन करण्याची बाब चुकीचीच अाहे. अशा रुग्णाला घरीच अाॅक्सिजन सिलिंडर लावून पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणे शक्य हाेते. तसेच संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट अायुक्त वा उच्चपदस्थ अधिकारी, लाेकप्रतिनिधींच्या मदतीने हा विषय साेडवणे अावश्यक हाेते. मात्र, संबंधित रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार तर झालाच, मात्र अतिसंसर्गजन्य अाजाराशी संबंधित रुग्णाला वर्दळ असलेल्या भागात अाणल्यामुळे त्याच्यापासून अन्य व्यक्तींना धाेका पाेहाेचेल अशी कृती केल्यामुळे ‘हे चुकीचेच’ अशी प्रतिक्रिया उमटली.

२०० ऑक्सिजन बेड पुन्हा वाढवले
अाॅक्सिजन लेव्हल केवळ ३५ टक्के असतानाही राजीव गांधी भवन अावारात अांदाेलकांनी अाणलेला काेराेना रुग्ण

प्रकरणाची चाैकशी करणार
नेमके काय झाले हे उच्चस्तरीय चाैकशीतून समाेर येईल. खराेखर रुग्णाने बेडसाठी काेठे संपर्क केला, सीबीअारएस सिस्टिमवर काॅल केला हाेता का हे तपासले जाईल. यात शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काेणी करीत असेल तर त्यांच्यावरही कठाेर कारवाई केली जाईल. - कैलास जाधव, अायुक्त

तीन दिवसांपूर्वी बाधित; पूर्वी उपचार काेठे घेतल्याबाबत संभ्रम
यातील अाॅक्सिजन सििलंंडर लावलेल्या रुग्णाचा अहवाल तीन दिवसांपूर्वी बाधित अाल्याचा दावा डाेके यांनी केला. या रुग्णाचा अहवाल साेबत नव्हता, मात्र ताे घरी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मागील तीन दिवस तसेच काेराेना चाचणी करण्यापूर्वी रुग्णाने काय उपचार घेतले, वेळीच उपचार झाले नाही का? रुग्णाची घरीच परिस्थिती खराब झाल्यानंतर ताे अाला का? तसेच, जे अाॅक्सिजन सिलिंडर लावले गेले हाेते ते नेमके काेठून अाणले हे शाेधणे गरजेचे अाहे.

गेल्या चार दिवसांत ३६ रुग्णालयांमध्ये तब्बल १०१९ बेड नव्याने वाढवल्यानंतर आता, बुधवारी ११ रुग्णालयात पुन्हा २०६ नवीन बेड वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता, १२८ रुग्णालयांमध्ये आता ४७७१ बेड उपलब्ध झाले आहेत. महापालिकेने डॉ. झाकीर हसेन आणि बिटको रुग्णालयात अनुक्रमे १५० आणि ५०० बेड उपलब्ध करून दिले आहेत. पाचशे बेडचे समाजकल्याण कोविड सेंटरही सुरू करण्यात आले आहे. याबराेबरच ८३ खासगी रुग्णालयांमध्ये ३५४६ बेड उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या काही दिवसांत बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्तांनी गेल्या काही दिवसांत तब्बल ३६ रुग्णालयांमध्ये १०१९ बेड वाढवले आहेत.

प्रशासनाला बदनाम करण्याच्या प्रयत्न?
बिटकाे, डाॅ. झाकीर हुसेन किंबहुना वेळ पडल्यास खासगी रुग्णालयात सवलतीत उपचारासाठी पालिकेची धडपड सुरू अाहे. तसेच जिल्हा रुग्णालय अाणि मविप्रच्या रुग्णालयातही रुग्ण दाखल केले जातात. त्यामुळे या दाेन रुग्णांना खरंच बेड मिळाले नाहीत का? की, ही स्टंटबाजी हाेती? कारण यापूर्वी डाेकेंकडून अाक्षेपार्ह अांदाेलने झाल्यामुळे वस्तुस्थिती तपासून त्यातही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाचीही फूस अाहे का हे तपासले जाऊन शासनाला अडचणीत अाणण्याचा प्रयत्न असेल तर तसा अहवालही जाऊ शकताे, असे सूत्रांचे म्हणणे अाहे.

बातम्या आणखी आहेत...