आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Corona Death | Aadhar Card | Marathi News | Help Only If The Aadhaar Number Of The Heirs Of The Corona Deceased Is Linked To A Bank Account; Government's Decision Due To Increasing Difficulties

आधार लिंक करण्याचे आवाहन:कोरोना मृतांच्या वारसांचा आधार क्रमांक बँक खात्यास लिंक असल्यासच मदत; अडचणी वाढल्याने शासनाचा निर्णय

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून कोरोना मृतांच्या वारसांना देण्यात येणारे ५० हजाराचे अनुदान आता बँक खात्यास आधार लिंक असेल तर केवळ आधार नंबरच्या आधारावरच मिळणार आहे. त्यासाठी संबधित अर्जदारांनी आपले आधार बँक खात्यास लिंक करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी (दि. १७) कोरोना मृतांच्या वारसांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचा आढावा सचिवांनी घेतला. त्यात अनेक अर्जदारांचे आलेल्या अर्जांमध्ये बँक खाते अन् इतर बाबींची माहीती चुकीची किंवा अपूर्ण भरलेली असल्याचे उघड झाले. अनेकांकडून खाते नंबर लिहीताना त्यात टायपिंग मिस्टेकही झाल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना मदत मिळण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आले. त्यावर सचिवांनी आधार नंबरद्वारेच मदत देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

त्यानुसार वेळेत अर्ज केलेल्या परंतु, अजूनही मदत प्राप्त न झालेल्या व्यक्तींना आपल्या बँक खात्यास आधार नंबर लिंक करावा लागेल. तसे केल्यास शासकीय यंणत्रेकडून लागलीच त्यांच्या आधार नंबरला लिंक असलेल्या खात्यात त्वरित मदत वितरीत केली जाईल. त्यामुळे कोरोना मृतांच्या वारसांना शासनाकडून मिळणाऱ्या ५० हजारांचे सानुग्रह अनुदानासाठी आपले बँक खात्यास त्वरित आधार जोडणी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. कोरोना मृतांच्या वारसांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने राज्य शासनाने याबाबत वारसाच्या बँक खात्यास आधार क्रमांक लिंक असणे अनिवार्य केले आहे.

जिल्ह्यातील ८ हजार ७१३ अर्ज मंजूर
आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ३२१ मृतांच्या वारसांना ५० हजाराच्या मदतीसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यातील ८ हजार ७१३ अर्ज मंजूर झाले आहे. तर ८७७ अर्ज बाद झाले असून त्यांना तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. तेथे त्यांना कागदपत्रांसह अर्ज नामंजूर केलेल्या अपुर्ण बाबींची पूर्तता केल्यास लागलीच त्यांचा अर्ज मदतीसाठी मंजूर करता येईल. दरम्यान जिल्ह्यास तीन ठिकाणी अपील व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक शहरासाठी महापालिका, मालेगाव शहरासाठी मालेगाव मनपा आणि ग्रामीण भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अपील करता येईल.

बातम्या आणखी आहेत...